मुंबई सेंट्रल टर्मिनस स्थानकाचे नाव नाना शंकर शेठ रेल्वे स्थानक होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन    
	        
	 
					
    मुंबई, दि ३०
नामदार नाना शंकर शेठ समितीच्या वतीने सौ. पद्मिनिताई विलासराव शंकरशेट यांच्या पुढाकाराने आणि आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याच्या प्रलंबित विषयास गती मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले. याबाबत आमच्याकडे आपला हा प्रस्ताव गेला अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आपल्या या विषयावर लवकरात लवकर मुंबई सेंटर रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ टर्मिनस रेल्वे स्थानक असे नामांतर होईल असे सूतोवाच केले. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मुंबई सेंटर रेल्वे टर्मिनसला नाना शंकर चे रेल्वे टर्मिनस असे नामांतर करण्यात यावे याबाबत वारंवार पाठपुरावा करत आहोत. परंतु त्यावर अजून देखील अंमलबजावणी झाली नाही त्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज इतरदायी वाघ यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंटर रेल्वे स्थानकाला देण्यात येईल अशी माहिती पद्मिनी विलासराव शंकर शेठ यांनी दिली. सदर शिष्टमंडळात माननीय आमदार सौ चित्राताई, सौ. पद्मिनिताई विलासराव शंकरशेट, सौ. नंदाताई शंकरशेट, जळगांवचे माजी आमदार ॲड. श्री जयप्रकाश बाविस्कर, माजी सहकार सह आयुक्त श्री संजीव खडके, पनवेलच्या आदर्श संस्थेचे चेअरमन श्री धनराज विसपुते व गोल्ड व्ह्याल्यूर्स असोसिएशन, महाराष्ट्रचे प्रशासकीय सचिव श्री सतीश पितळे होते.KK/ML/MS
 
                             
                                     
                                    