चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार Car
पॅरीस, दि. २९ : फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा असा अनोखा मोटर वे तयार झाला असून, इथं इलेक्ट्रीक वाहनं आहे त्या वेगात चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार आहेत. हा रस्ताच उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करताना दिसतोय. फ्रान्समध्ये जगातील हा पहिलावहिला वाहनं चार्ज करणारा मोटर वे सुरू ढाला असून, यामध्ये डायनामिक वायरलेस चार्जिंग सिस्टम लावण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं इलेक्र्टीक वाहनं आपोआप चार्ज होणार असून, आता कार किंवा ट्रकला चार्जिंग स्टेशन शोधत तिथं थांबण्याची गरज नाही.
पॅरिसपासून जवळपास 40 किमी अंतरावर दक्षिण पश्चिमेस असणाऱ्या A10 मोटरवेवर हा प्रयोग सुरू करण्यात आला असून, अनेक संस्थांनी मिळून Charge As You Drive हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. फ्रान्सचा हा A10 मोटरवे 1.5 किमी लांबीचा असून, या रस्त्यामध्ये अनेक कॉईल बसवण्यात आल्या आहेत. याच कॉईलच्या माध्यमातून त्यावरून जाणारी इलेक्ट्रीक वाहनं आपोआपच त्यातून वाहणाऱ्या विजेच्या माध्यमातून चार्ज होतील. चाचणीदरम्यान हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं. यामध्ये 300 किलोवॅटहून अधिक पीक पॉवर आणि सरासरी 200 किलोवॅट इतकी विद्युत संक्षेपण क्षमता दिसून आली.
SL/ML/SL