केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा मोफत इलाज

 केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा मोफत इलाज

पुणे, दि २९: केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा सामाजिक उपक्रम मागील 30 वर्षांपासून राबविण्यात येतो. यंदा 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे आप्तसंबंधी आपापले मनोगत व्यक्त करतील. कमांड हॉस्पिटल (दक्षिण मुख्यालय), पुणे येथील चरक ऑडिटोरियम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. एन. एस. न्यायापथी यांनी दिली.

उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना संस्था संचालिका तसनीम शेख यांनी सांगितले की, केअर इंडिया मेडिकल सोसायटीची स्थापना 1993 साली झाली,1995 पासून दरवर्षी दिवाळी निमित्त ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा सामाजिक उपक्रम हे राबवत आहेत. यंदा या उपक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव (संचालक व कमांडंट, एएफएमसी, पुणे), मेजर जनरल बी. नाम्बियार (कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे – एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम) तसेच श्री. विकस छाब्रा (एरिया व्हाइस प्रेसिडेंट व डायरेक्टर, बीएमसी सॉफ्टवेअर) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लेफ्टनंट जनरल एम. ए. टुटकणे (निवृत्त) भूषवणार असून ट्रस्टी मंडळ आणि सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित राहणार आहेत.

केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे ‘सुरुवातीच्या काळात, जे कॅन्सर रुग्ण शेवटच्या टप्यात आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा त्रास कमी व्हावा असे उपचार त्यांच्यावर केले जात. कालानुरूप गरजेनुसार रुग्णांच्या मागणीखातीर केमोथेरपी विश्रांती रुग्णालयात सुरू करण्यात आली. रेडियशन आणि अन्य उपचारांसाठी रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवविण्यात येत, मात्र त्यांचा संपूर्ण खर्च केअर इंडिया मेडिकल सोसायटी उचलते.

केअर इंडिया मेडिकल सोसायटी दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना प्रोत्साहन देत समाजात सकारात्मकता आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचवते. ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा यावर्षीचा स्नेहसोहळा नेहमीप्रमाणेच रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा आणि आनंदाचा प्रकाश फुलविणारा ठरेल असा विश्वास डॉ. डॉ. एन. एस. न्यायापथी यांनी व्यक्त केला.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *