‘रामायण कंट्री’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशात भव्य राममंदिराची उभारणी
पोर्ट ऑफ स्पेन,दि. २७ : भारताशी सांस्कृतिक संबंध असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात भव्य राममंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला सरकारने मंजूरी दिली असून, याचा उद्देश हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे. या देशाला ‘रामायण कंट्री’ म्हणून ओळखले जाते आणि येथे ‘मिनी अयोध्या’ उभारण्याचाही प्रस्ताव आहे. सुमारे 15 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात 3.5 लाखांहून अधिक हिंदू राहतात. अमेरिका खंडातील मोजक्या देशांपैकी हा एक असा देश आहे, जिथे हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही राष्ट्रीय जीवनात खोलवर रुजलेल्या आहेत.
त्रिनिदाद आणि टोबॅगो देश आपल्या राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये एक भव्य राम मंदिर बांधण्याच्या तयारीत आहे. हा कॅरेबियाई प्रदेशात हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीला नवी ओळख देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
SL/ML/SL