अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार

 अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार

ठाणे दि २७: हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बाल दिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह 11, 111 रुपये रोख असे आहे. तसेच, दोन वर्षांपूर्वी पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे.

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, गेल्यावर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येत आहे.

पद्मश्री अशोक सराफ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर व इतर यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के – सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोघ चंदन यांनी परीक्षण केले होते. १५ बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी

१ श्रेयस थोरात
२ शिवानी रांगोळे
३ शिवराज वायचळ

बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी संक्रमण, पुणे (संस्था प्रमुख यतीन माझिरे) या संस्थेला देण्यात येणार आहे. दरवर्षी एकांकिका आयोजन करणाऱ्या आयोजन समितीला देखील पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये आणि इंडियन नॅशनल थिएटर आर्ट म्हणजेच आय एन टीला पुरस्कार देण्यात येणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *