जोरदार पावसाचा कापूस पिकाला फटका
जालना दि २७ : जालन्यात झालेल्या दमदार पावसाने कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातील काही भागांत काल जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वेचणीस आलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे. याचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून कापूस, द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.ML/ML/MS