भारत डायमंड बोर्सचा स्थापना दिन साजरा
मुंबई दि २६ : भारत डायमंड बोर्सने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे त्यांचा ४१ वा स्थापना दिन आणि १५ वर्षे यशस्वी कामकाज साजरे केला. या प्रसंगी जागतिक हिरे व्यापारात इंडिया डायमंड बोर्सच्या योगदानाचे प्रतीक असलेले एक स्मारक टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले.
भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनूप मेहता यांनी स्वागत भाषण केले . प्रमुख पाहुणे संस्कृति कार्यमंत्री आशिष शेलार, माजी खासदार पूनम महाजन तसेच महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर अमिताभ सिंग हे टपाल तिकिट प्रकाशन समारंभात उपस्थित होते. यावेळी कंपनीची १०, १५, २० आणि ४० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले – “मेरा बोर्स मेरा अभिमान” या गाण्याने समारोप झाला.
भारत डायमंड बोर्सची कामगिरी: – १९८४ पासून जागतिक हिऱ्या व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान –
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये १५ वर्षे यशस्वी कामकाज –
“जगाचे हिरे केंद्र” म्हणून ओळखले जाणारे काम..ML/ML/MS