भंडारा जिल्ह्यात धान पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत….
भंडारा दि २६ :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्ह्यातील शेतकरी धान पीक घेत असतात. आता ऑक्टोबर महिन्यात धान कापणीला आले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीवर धान पीक कापणी करून ठेवली, नंतर मळणी करून धान घरी नेणार होते. पण पावसाने होत्याच नव्हतं केलं.
काल सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली व शेतात कापून ठेवलेलं धान संपूर्ण पाण्याखाली गेलं. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून धान पिकांची लागवड केली पण सर्व काही पावसाने हिरवून नेल. आधीच शेतकरी कर्ज काढून कसा बसा सावरण्याचा प्रयत्न करतो पण अस्मानी संकट शेतकऱ्याला उभाच होऊ देत नाही. आता शेतकऱ्यांनी जगाव की मरावं असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.ML/ML/MS