*सचिन आंबात दिग्दर्शित “असुरवन” चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
मुंबई, दि २४
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरला तब्बल १ मिलियन व्यूज मिळाले आहेत तसेच या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्कंठा अधिकच वाढते आहे. सचिन आंबात लिखित व दिग्दर्शित ‘असुरवन’ हा चित्रपट आदिवासी प्राचीन वारली परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय.
दिग्दर्शक सचिन आंबात चित्रपटाच्या मोशन पोस्टरविषयी सांगतात, “माझ्या पहिल्या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतचं सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्या मोशन पोस्टरमध्ये, जंगल दिसत आहे, तर ते श्रापित जंगल आहे म्हणून ते “असुरवन” नावाने प्रचलित आहे आणि त्या असुरवनात मध्यभागी मुखवटा धारण केलेला पात्र दिसत आहे, त्या मुखवट्याला आदिवासी वारली भाषेत “ देवाचा सोंग “ म्हंटल जातं.”
पुढे तो सांगतो, “जो मुखवटा धारण केला आहे तो “फिरसत्या” देवाचा आहे. हा फिरसत्या देव जंगलात हरवलेल्या चांगल्या मनाच्या लोकांना रस्ता दाखवतो आणि जे वाईट मनाने जंगलात सापडतील त्यांना चकवा लावून त्या जंगलात बंदिस्त करतो. तर हा “फिरसत्या” रस्ता दाखवतो की चकवा लावतो हे तुम्हाला “असुरवन” चित्रपटात पाहायला मिळेल. असुरवन हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”
Link : https://www.instagram.com/reel/DP-k1IIkQnH/?igsh=a3RzZmNpM25vNTdq
KK/ML/MS