डॉ गजानन रत्नपारखी याच्यां ” गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची दिवाळी जल्लोषात साजरी
मुंबई, दि २०
डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची दिवाळी पहाट कार्यक्रम एमसीवीपी l हॉल , जुहू येथे जल्लोषात संपन्न झाला.
ह्या कार्यक्रमाचे चे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ घाटकर, डॉ शशांक शाह , डॉ अश्विनी चव्हाण, डॉ शरद दधिच, डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग ह्यांनी केले. या कार्यक्रमात 400 पेक्षा जास्त डॉक्टर अणि त्यांच्या परिवाराने ह्यात भाग घेतला होता . या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी रांगोळी स्पर्धा येऊन करण्यात आली. त्यात अत्यंत सुंदर आणि सोशल मेसेज असणार्या रांगोळीना पारितोषिक दिले गेले. त्यात 10 वर्षा च्या मुलीं पासून 75 वर्षा च्या आजींनी भाग मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला होता.
श्रेयस पाटकर ह्यांच्या ” कशिश” ऑर्केस्ट्रा* द्वारे सुमधुर संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. वयाचे भान विसरून अनेक डॉक्टर्स संगीताच्या तालावर थीरकले.
लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील झाली आणि सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.बेस्ट ड्रेस कपल, बेस्ट ड्रेस महिला, बेस्ट ड्रेस पुरुष अशी अनेक बक्षीसे देण्यात आली.
12 डॉक्टर्स नी शेर-शायरी ह्या कार्यक्रमात शायरी चि झलक सादर केली अणि प्रेक्षकांची वाह वाह मिळवली.
या कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम , बॉलीवूड अभिनेत्री चिरतरुण भाग्यश्री ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी डॉ राम चव्हाण आणि डॉ अश्विनी चव्हाण , डॉ शशांक शाह, डॉ राजेश तिवारी डॉ सीमा तिवारी ,
डॉ नीता व डॉ प्रबोध ममतोरा. डॉ दीपाली अणि डॉ गजानन काटे डॉ अशोक सिंघ , डॉ शरद दधीच , डॉ सुहास वोरा , डॉ समीर पाटील , डॉ स्मिता पाटील , डॉ प्रियंवदा शर्मा, डॉ मोना गांधी , डॉ शिल्पा बन्सल ह्यांची मोलाची मदत अणि साथ लाभली.
आम्ही दरवर्षी दिवाळी निमित्त सगळ्या डॉक्टरांना निमंत्रित करून त्यांच्यासोबत दिवाळी पहाट हा कार्यक्रम सादर करतो. यावर्षी देखील आम्ही हा दिवाळी पहाट कार्यक्रम सादर केला आणि या कार्यक्रमाच्या सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला असल्याची माहिती गुरुकृपा महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिली.KK/ML/MS