२९ लाख दिव्यांनी सजली अयोध्या, झाला ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’

 २९ लाख दिव्यांनी सजली अयोध्या, झाला ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’

अयोध्या, दि. २० : दिवाळीनिमित्त प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी २९ लाख दिव्यांनी उजळून निघाली आहे. या निमित्ताने ही विक्रमी आरास तसेच अन्य एक विक्रम ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदला गेला आहे. ‘राम की पैडी’ येथील ५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच शरयू तीरावर अन्यत्रही दिव्यांची आरास करण्यात आली होती. अयोध्या नगरी एकूण २९ लाख दिव्यांनी झळाळून गेली होती. हा ‘दीपोत्सव’ पाहण्यासाठी जगभरातून लोक अयोध्येत दाखल झाले आहेत. ड्रोनच्या सहाय्याने या दिव्यांची गणना केल्यानंतर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे स्वप्निल दंगारीकर व सल्लागार निश्चल बारोट यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली.

सलग नवव्यांदा हा जागतिक विक्रम बनला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रभारी मंत्री सूर्य प्रताप शाही व अन्य या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले. तसेच शरयू नदीवर झालेल्या आरतीत २,१०० वेदाचार्य सहभागी झाले होते. या विक्रमाचीही नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.

‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या ७५ जणांच्या पथकाने शरयू नदी तीरावरील ५६ घाटांवरील दिव्यांची मोजणी केली. यासाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, घाट प्रभारी, समन्वयक व स्वयंसेवक उपस्थित होते. दिवे लावण्यापूर्वी घाटावर तेल पडू नये याकडे बारकाईने लक्ष दिले गेले.

दीपोत्सवापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘रामकथा पार्क’च्या मंचावर श्रीराम यांची सांग्रसंगीत पूजा केली. मुख्यमंत्री योगी यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांचीही पूजा केली. यावेळी ‘जय श्रीरामा’च्या जयघोषाने शरयू तीर दुमदुमून गेले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *