दिवाळीत मॉरिशियन ‘काळ्या उसाला’ चांगली मागणी
वाशीम दि २०: दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असताना, यंदा वाशीमच्या बाजारपेठेत काळ्या रंगाच्या मॉरिशियन उसाची खास चर्चा आहे. हा उस जिल्ह्यातील काटा गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला असून, त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ऐतिहासिक माहितीनुसार, १८ व्या शतकात मुंबईचे प्रतिष्ठित उद्योगपती आणि समाजसेवक जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना सेठ यांनी मॉरिशियस देशातून काळ्या उसाचे वाण भारतात आणले. कालांतराने या उसाची लागवड विदर्भातील काही भागात, विशेषतः वाशीम जिल्ह्यातील काटा गावात सुरू झाली. काळा उस हा गोड, रसाळ आणि टिकाऊ असल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी उसाला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व असल्याने बाजारात त्याला विशेष मागणी आहे. काटा गावातून वाशीम बाजारात आलेल्या काळ्या उसाच्या जोड्या सध्या १०० ते १२० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. स्थानिक विक्रेत्यांच्या मते, या उसाचा रंग, गोडवा आणि टिकाव यामुळे दरवर्षी त्याची मागणी वाढतच चालली आहे.ML/ML/MS