गिरगाव येथे सोसायटीने वाटले सभासदांना दिवाळी बोनस

मुंबई, दि १९: गिरगावातल्या तात्या घारपुरे पथावर असलेली विजयश्री गृहनिर्माण को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मोबाईल टॉवर आणि इतर माध्यमातून देखभाल आणि व्यवस्थापनातून जमा होणाऱ्या वाढीव रक्कमेतून तब्बल ५५ सभासदांना प्रत्येक कुटुंब मागे ६ हजार रुपयांचा घवघवीत दिवाळी बोनस वाटप करत प्रत्येक सभासदाची दिवाळी गोड करण्याचे कार्य केले आहे.
याप्रसंगी मनसे पदाधिकारी श्रीधर जगताप यांनी भाषणात विजयश्री गृहनिर्माण संस्था सभासदांना दिवाळी बोनस देणारी मुंबई शहरातील एकमेव संस्था असल्याचे आवर्जून नमूद केले व संस्थेच्या कार्यकारिणीचे सेक्रेटरी विजय चाळके यांचे कौतुक केले तसेच इमारतीच्या अभिहस्तांतरणाबाबत भाजपा विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला असून इमारतीचे अभिहस्तांतरणाबाबत व इतर तक्रारीचे निवारण म्हाडा कार्यालयात दरेकर ह्यांची लवकरच भेट घेऊन सर्व प्रश्नन मार्गी लावण्याचे आश्वासन जगताप ह्यांनी दिले.
माजी नगरसेविका अनुराधा पोद्दार यांनी आपल्या भाषणात दिवाळी सण व त्या निमित्ताने सर्व सभासदांना मिळणारा बोनस हा दुग्ध शर्करा योग व आनंदायी क्षण असून संस्थेच्या कार्यकारिणीचे कौतुक केले. तसेच उपस्थित महिलांना आपले घरगुती काम प्रापंचिक समस्या इत्यादी बाबत पुराणातील उदाहरण देऊन समस्येवर मात करून सुखी समाधानी जीवन कसे जगता येईल याबद्दल अनुराधा पोद्दार यांनी महिलाना मार्गदर्शन केले .
माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी आपल्या भाषणात संस्थेचा कारभार मागील कित्येक वर्ष जवळून पहात असून त्यात कुठेही खंड पडलेला नाही व उत्तरोत्तर संस्थेची भरभराट होताना पाहून आनंद वाटतो त्यात काही वर्षापासून सभासदांना दिवाळी बोनस देणे खर्चाचे नियोजन करून सभासदांना मेंटेनन्स बिलाचा जादा भार न टाकता दिलासा देणे संस्थेचा कारभार नीटनेटका चालवणे याबाबत संस्थेचे सेक्रेटरी विजय चाळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करून सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मास कम्युनिकेशन संचालक आणि
संस्थेचे लेखापाल मनीष हळदणकर यांनी संस्थेचा लेखाजोखा पत्र व्यवहार वार्षिक अंदाजपत्रक व त्यानुसार संस्थेचे आर्थिक गणित सांभाळून संस्थेचा कारभार चालवणारे सर्वोत्कृष्ट संस्था असून अशा संस्थेचे अनुकरण करण्याबाबत इतर गृहनिर्माण संस्थांना विजयश्री संस्थेचे उदाहरण नेहमी देत असतात सभसदन बोनस देणारी एकमेव संस्था व बोनस वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा विशेष आनंदही क्षण असतो त्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी व त्यांचे कार्यकारिणीचे सर्व सदस्यांचे कौतुक केले व सर्व सभासदांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय श्री सोसायटीचे कार्यकारणी व असंख्य रहिवाशी उपस्थित होते. KK/ML/MS