छोट्या आकाश कंदीलने दिली मोठी ओळख
बारावी महिने बनवतात छोटे आकाश कंदील

मुंबई, दि १९: गिरगावातल्या मूगभाट क्रॉस लेन येथील श्री भुवन चाळीत राहणारे ७१ वर्षांचे शशिकांत वेशविकर पूर्वी सोन्याचांदीचे दागिने घडवण्याचे काम करत होते. परंतु कालांतराने सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर सोन्याचे काम मिळणे त्यांना कठीण झाले होते. पाच सहा वर्षांपूर्वी कामाची कमतरता जाणवत असताना त्यांना एक विलक्षण अशी कल्पना सुचली सोन्याचांदीचे दागिने ज्या हत्यारांनी वेशविकर घडवत होते त्या हत्यारानं पैकी काही छोट्या छोट्या हत्यारांचा वापर करून ते तीनचार इंचाचे आणि विविध रंगाचे आकाराचे लहानलहान आकाश कंदील बनवू लागले होते. सध्या सोशल मीडियावर शशिकांत वेशविकर तयार करत असलेल्या छोट्या छोट्या आकाश कंदीलांची मुंबईभरात खूपच चर्चा पसरली आहे. काही प्रसिद्धी माध्यमांनी देखील शशिकांत वेशविकर यांनी अगरबतीच्या काड्या आणि सोनार कामाच्या हत्यारानपासून तयार केलेल्या आकाश कंदिलची बातमी प्रसिद्धी केल्याने सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. शशिकांत वेशविकार हे मूळचे सोनार समाज म्हणजेच दैवज्ञ समाजातले असून पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरातील मंडळी सोन्याचांदीच्या व्यवसाय करत आली आहेत. परंतु सोन्याच्या वाढत्या दरामुळे ,बाहेरील होलसेल व्यापारी, आणि बंगाली कारागिरांच्या वाढत्या प्रभावामुळे दैवज्ञ समाजातील सोनार काम करणाऱ्या कारागिरांवर वाईट परिस्थिती आली आहे. त्यामुळे शशिकांत वेशविकर यांनी उदरनिर्वाह चालवण्यासाठी काहीतरी वेगळ आणि अनोख काम केल तरच आपल्याला संसाराची गाडी हाकत येऊ शकते हे जाणले होते. त्या उद्देशाने सोन्या चांदीच्या दागिने घडवणाऱ्या हत्यारापासून ते छोटे छोटे आकाश कंदील तयार करू लागले होते. आज घडीला शशिकांत वेशविकर आणि त्यांच्या सौ शरयू वेशविकर हे दोघेजण मिळून ५०० छोट्या आकाश कंदिलांची ऑर्डर पूर्ण केली आहे. हे कंदील छोटे आणि आकर्षक दिसत असल्यामुळे याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तसेच घरातल्या सजावटीसाठी आणि दरवाजा बाहेरील सजावट , बर्थडे पार्टी आणि सणासुदीला सजावट करण्यासाठी छोट्या आकाश कंदीलाची मागणी वाढत चालली आहे. आता बाराही महिने छोट्या आकाश कंदीलांच्या ऑर्डर येऊ लागल्याने आम्ही आता उदरनिर्वाह सोन्याचांदी ऐवजी कंदीलामुळे चालू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी एक महिला अमेरिकेला दहा छोटे आकाश कंदील घेऊन गेली. तर भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या घरी देखील दिवाळीला सजावट करण्यासाठी यंदा आमचे आकाश कंदील रवाना झाल्याने आम्हाला फार मोठा आनंद झाला असल्याची माहिती शशिकांत वेसवीकर ह्यांनी दिली.
सोन्याच्या हत्यारांमुळे आकाश कंदील तयार करत असल्यामुळे आमच्या आकाश कंदिलना आता सोनेरी झळाळी आल्याचं मत शरयू विश्वकर यांनी व्यक्त केले आहे.KK/ML/MS