धोबीघाट येथे झाले नवीन शिवसेना शाखेचे उद्घाटन

मुंबई, दि १९
शिवसेना प्रभाग क्रमांक १९९ मधील नवीन शिवसेना शाखेचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले. यावेळी विभागाचे स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसैनिकांनी काम केले पाहिजे. शिवसैनिक हा तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असला पाहिजे. आज या ठिकाणी नवीन शाखेचे उद्घाटन झाले असून या शाखेतून सामान्य शिवसैनिकांचा आणि नागरिकांच्या समस्या नक्कीच सुटतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि येणाऱ्या महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार अशी ग्वाही तुम्हाला मी आज या ठिकाणी देतो अशी माहिती शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणातून दिली.
वरळी विधानसभेत आम्ही जोमाने काम करत असून प्रत्येक शिवसैनिकाचे आणि नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहोत. परळी विधानसभेत आमदारकीला आमचा निशक्त पराभव जरी झाला असला तरी आम्हाला लोकांनी स्वीकारले आहे. पुढे वरळी विधानसभेतील सर्वोच्च सर्व नगरसेवक निवडून आणल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. अशी माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्त नरवणकर यांनी या समारंभात दिली.
या प्रसंगी शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी., शिवसेना उपनेत्या सुशिबेन शहा, वरळी विधानसभा प्रभारी संघटक प्रशांत गवस,वरळी महिला संघटक अस्मिता ननावरे,वरळी महिला विधानसभा समन्वयक रोहिणी खंडाळे,युवती विभागप्रमुख निकिता घडशी, युवा विभाग प्रमुख साईकिरण सेपूरी,महिला शाखा प्रमुख ज्योतीताई सकपाळ,महिला उपनघटक ज्योती प्रभुलकर,महिला शाखा समन्वयक लक्ष्मीताई शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली.KK/ML/MS