दिल्ली-NCRमध्ये ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी

नवी दिल्ली, दि. १५ : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमध्ये हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, “आपण संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, परंतु पर्यावरणाशी तडजोड करणार नाही. आम्ही काही अटींसह हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देत आहोत.” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ ते २१ ऑक्टोबरपर्यंत फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके वाजवण्यास परवानगी असेल. न्यायालयाने सांगितले की, २० ऑक्टोबर रोजी दिवाळीला सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० वाजेपर्यंत हिरवे फटाके वाजवण्यास परवानगी असेल.
न्यायालयाचे ५ आदेश-
१. गस्त घालणारे पथके नियमितपणे प्रत्येक हिरव्या फटाक्याच्या उत्पादकाची तपासणी करतील. हिरव्या फटाक्याच्या कंटेनरवरील QR कोड वेबसाइटवर अपलोड केले जातील.
२. बाहेरील भागातून एनसीआर प्रदेशात फटाके आणण्याची परवानगी दिली जाणार नाही.
३. बनावट फटाके आढळल्यास परवाना रद्द केला जाईल.
४. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (SPCB) १८ ऑक्टोबरपासून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचे (AQI) निरीक्षण करतील आणि या संदर्भात न्यायालयाला अहवाल सादर करतील.
५. पाण्याचा नमुना देखील घेतला जाईल.
SL/ML/SL 15 Oct. 2025