BIS च्यावतीने मुंबईत ‘मानक महोत्सव’

 BIS च्यावतीने मुंबईत ‘मानक महोत्सव’

मुंबई, दि. १४ : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय मानक संस्था, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने मुंबईतील अंधेरी उपनगरामध्‍ये भारत रत्नम – मेगा सीएफसी, सीप्झ येथे “एक सामायिक दृष्टी एका चांगल्या जगासाठी – शाश्वत विकास उद्दिष्टे 17 वर विशेष लक्ष : उद्दिष्टांसाठी भागीदारी” ही संकल्पना मध्‍यवर्ती ठेवून जागतिक मानक दिन साजरा केला. या मानक महोत्सव कार्यक्रमात दैनंदिन जीवनात सुरक्षितता, गुणवत्ता आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या विकासात योगदान देणारे हजारो तज्ञ आणि संस्थांप्रती आदरभावना व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरू आणि संस्थेच्या मुंबई शाखेचे प्रमुख प्रा. यू. कामाची मुदाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. मुदाली यांनी विशिष्‍ट प्रकारच्या सामु्ग्री निर्मितीच्यावेळी उद्योग आणि उत्पादनामध्‍ये सुसंगतता राखताना मानकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (आयएसओ) आणि आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (आयईसी) सारख्या संस्थांसोबत सहकार्य करून भारतीय मानकांना आंतरराष्ट्रीय स्‍तरावर जुळवून घेण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी ‘बीआयएस’ चे कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान, ‘ऑल इंडिया फर्स्ट लायसन्‍सींचा गौरव केला. परवानाधारक, हॉलमार्किंग केंद्रे, प्रसार माध्‍यमातील भागीदार , बीआयएस स्टँडर्ड्स क्लब मार्गदर्शक, स्वयंसेवी संस्था आणि संसाधने पुरवणा-या मंडळींसारख्या भागधारकांना देशात गुणवत्तापूर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी सक्रिय योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

या समारंभात, जागतिक मानक दिन 2025 निमित्त बीआयएस मुंबई शाखेकडून ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) मुंबईला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत झालेल्या समारंभात पीआयबी मुंबईच्यावतीने ‘माध्‍यम आणि संप्रेषण अधिकारी सोनल तुपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्राहक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, गुणवत्तेची संस्कृती जोपासण्यासाठी आणि माहितीच्या सक्रिय प्रसाराद्वारे देशाच्या गुणवत्ता परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी पीआयबीच्या समर्पित प्रयत्नांना दिलेली ही पावती असून बीआयएससोबतची निरंतर भागीदारी अधोरेखित करते.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *