उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन

मुंबई, दि. १४ : ठाकरे बंधूमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दिसत असलेल्या सौहार्दाच्या संबंधांमुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते उत्साहात आहे. लवकरच येऊ घातलेल्या मुंबई मनपाच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूमधील संबंध अधिकाधीक सुधारत असल्याचे चित्र विविध उपक्रमांद्वारे ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाकडे जाऊन आपले निवेदन दिलं आहे. त्यानिमित्ताने आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंची ही सातवी भेट आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. मनसेच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्धाटन यंदा चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत.
उद्धव ठाकरेंचं नाव मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेत छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय याची देखील चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. केवळ, औपचारीत घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
SL/ML/SL 14 Oct. 2025