बोपोडीत वृक्षारोपणआणि आरोग्य शिबीर

पुणे, दि १४: बोपोडी परिसरातील जनसेवक सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, संस्थापक /अध्यक्ष- गोदाई सोशल फाउंडेशन विनोदभाऊ दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी तसेच अभिष्टचिंतन सोहळा यांचा समावेश आहे.
या उपक्रमांची सुरुवात मंगळवार, दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला शाळा, बोपोडी येथे होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमाने होणार आहे.
यानंतर समता फाऊंडेशन यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर, महिला व पुरुषांसाठी मोफत चष्मे वाटप, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, तसेच मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी शिबीर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रुक्मिणी हॉल, बोपोडी येथे पार पडणार आहे.
या सर्व उपक्रमांनंतर सायंकाळी 6 वाजता रुक्मिणी हॉल, बोपोडी येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मा. विनोद दादासाहेब रणपिसे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.KK/ML/MS