आदिवासी भागात दिवाळी फराळाचे वितरण : शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी अभ्यासातील टक्केवारी वाढवावी

मुंबई, दि. १४ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून विद्यार्थ्यांनी अभ्यासातील टक्केवारी वाढवावी अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी सल्ला दिला. प्रभा हिरा गांधी विद्यालय आणि सक्षम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील मेढा या दुर्गम भागातील आदिवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले . या प्रसंगाचे औचित्य साधून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे स्वराज्याचा अपरिचित इतिहास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
शिवचरित्रातून मुलांनी अभ्यासात आपली टक्केवारी कशी वाढवावी, याचे मार्गदर्शन राजू देसाई यांनी केले आजपर्यंत सक्षम संस्थेतर्फे तीन संगणक व पाच शिलाई मशिन देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक प्रमोद लिमये आणि विश्वस्त रविंद्र मालडीकर, सतिश कामथ, चंद्रकांत ढवळे, शशिकांत चव्हाण, मिलिंद कोळी , अविक्षित राणे, विनायक गवाणकर, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.ML/ML/MS