कबुतरांना वाचवण्यासाठी जैन मुनींनी काढला राजकीय पक्ष

मुंबई, दि. ११ : मुंबईतील कबुतरखान्यावरून निर्माण झालेला वाद काहीसा शमला असताता आता पुन्हा या प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैन मुनी नीलेशचंद्र यांनी आज ‘शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली. विशेष म्हणजे हा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.जैन समाजाचे चिन्ह हे शांतिदूत कबुतर आहे. कबुतरांविरोधात जे आहेत, त्यांच्याशी आमचा वाद आहे. आमचा पक्ष केवळ जैन समाजाची पार्टी नाही, तर जेवढे मारवाडी, गुजराती आहेत. आम्ही एकत्र येत मुंबई मनपा निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत, असा निर्धार जैन मुनी नीलेशचंद्र यांनी बोलून दाखवला.
जैन मुनी नीलेशचंद्र म्हणाले की, जैन समाज हा शांतता प्रिय समाज आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारा समाज हा जैन समाज आहे. मारवाडी, गुजराती समाज सर्वात जास्त मदत कार्य करत आहे. कुठे काही आपत्ती आली तर जैन, मारवाडी, गुजराती समाज मदतीसाठी सर्वात पुढे असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे चिन्ह वाघ होता. त्यांच्यावर आई जगदंबेचा हात होता. आताच्या शिवसेनेचे मला माहिती नाही, असा टोलाही जैन मुनींनी लगावला.
जैन मुनी नीलेशचंद्र म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सुरू केली तेव्हा वाघाचे आधार कार्ड होते का? आमच्या शांतिदूताचेही नाही. जर शिवसेना वाघाच्या नावाने उभी राहू शकते, तर आमच्या जैन समाजाचा पक्ष कबुतराच्या नावाने सुरू होऊच शकतो.येणाऱ्या काळात आम्ही केवळ कबुतर नाही तर गोमातेसाठी लढणार आहोत. मानवतेसाठी काम करणारे लोक आमच्यासाठी काम करणार आहेत.जैन मुनी नीलेशचंद्र म्हणाले की, चादर, फादर सोडून राजस्थानमधील सर्व जातींच्या लोकांना आमच्या पक्षात प्रवेश राहिल. हा राजकीय पक्ष नाही. भगवान महावीर यांचा पक्ष आहे. महाराष्ट्रात मी केवळ बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांना मानतो. माझा कोणत्या पक्षाला विरोध नाही. पशूसाठी आम्ही काम करत आहोत.
SL/ML/SL 10 Oct. 2025