7 भारतीय कंपन्या आणि 8 भारतीयांवर अमेरिकेने घातली बंदी

मुंबई, दि. ११ : भारतीय कंपन्यांचे आणि भारतीयांचा इराणशी असलेले संबंध अमेरिकेला खुपत आहेत. त्यामुळे अमेरिकेने भारतीय कंपन्या आणि भारतीय व्यक्तींवर कारवाई केली आहे. यात 7 मुंबईतील कंपन्यासंहित इतर दोन भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. तसेच 8 भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की, या कंपन्या आणि कारवाई करण्यात आलेले व्यक्ती हे इराणचे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोकेमिकल्समध्ये सहभागी आहेत.
या यादीत मुंबईतील सीजे शाह अँड कंपनी, केमोविक, मोदी केम, पारिकेम रिर्सोर्सेस, इंडिसोल मार्केटिंग, हरेश पेट्रोकेम आणि शिव टेक्सकेम दिल्लीतील बीके सेल्स कॉर्पोरेशन समाविष्ट आहेत.
बंदीची कारवाई करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये केमोविकचे संचालक पीयूष जाविया, इंडिसोल मार्केटिंगचे संचालक नीती उन्मेश भट्ट, हरेश पेट्रोकेमचे संचालक कमला कसाट, कुणाल कसाट आणि पूनम कसाट वरुण पुला, इयप्पन राजा आणि सोनिया श्रेष्ठ यांचा समावेश आहे.
SL/ML/SL 10 Oct. 2025