पुण्यात ATS कडून दहशतवाद विरोधी मोहीम, 19 संशयितांच्यावर छापे!

 पुण्यात ATS कडून दहशतवाद विरोधी मोहीम, 19 संशयितांच्यावर छापे!

पुणे दि ९ : पुण्यातील कोंढवा भागामध्ये हशतवाद विरोधी पथकाने (ATS) रात्री बारा वाजेपासून ठीक ठिकाणी मोठी कारवाई करायला सुरुवात केली. गेल्या वर्षभराच्या काळामध्ये कोंडव्यासह पुण्यातील ठीक ठिकाणी दहशतवाद विरोधी पथक सर्च ऑपरेशन राबवत होते. दरम्यान, काल रात्री (9 ऑक्टो.) 12 वाजता कोंडव्यासह शहरातील 25 ठिकाणी ही कारवाई सुरू झाली. यामध्ये कोंढवा, खडक, खडकी, वानवडी व भोसरी या भागातील  19 संशयित इसमांच्या घरावरती व कार्यालयावरती छापे टाकून चौकशी मोहीम राबवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

ही मोहीम 2023 मध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची विचारपूस केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार राबवण्यात आल्याचेही समोर येते आहे. यासंदर्भात एटीएस कडून अधिकची चौकशी सुरू आहे. कोंढवा भागामध्ये पोलिसांची मोठी कुमक आणि बंदोबस्त असल्याचे दिसून आले आहे. या कारवाई मध्ये काही संशयितांची चौकशी करण्यात आलेली आहे. संबंधित व्यक्तींकडून लॅपटॉप, सिम कार्ड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे असे साहित्य मिळाले असल्याचीही माहिती आहे.

याबाबतची अधिकृत माहिती एटीएसचे अधिकारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थोड्याच वेळात देतील. तूर्तास पुणे सह पिंपरी चिंचवड भागातील काही भागांमध्ये एटीएस कडून चौकशी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये अंदाजे 300 पोलीस व 250 एटीएसचे अधिकारी अशी मोठी कुमक सद्ध्या पुण्यात आहे. सदर मोहीम 2023 मधील कार्यवाही मध्ये आढळलेल्या आरोपींच्या चौकशी मधून मिळालेल्या माहितीनुसार राबवली जात असल्याचे एटीएस कडून सांगण्यात आले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *