पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

 पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई, दि. ८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे. ते मुंबई मेट्रो लाईन 3 च्या फेज 2बी चे उद्घाटन देखील त्यांनी केले. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल कमळाच्या आकाराच्या डिझाइनमध्ये विकसित करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाणे सुरू होतील. हे मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात येणार आहे, आजच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी डी.बी. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख केला मात्र त्यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत अधिकृत वक्तव्य न केल्यामुळे विमानतळाच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या अकरा वर्षापासून देशवासीयांचे जीवन सुविधाजनक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच रेल्वे, रस्ते मार्ग, विमानतळ, मेट्रो, इलेक्ट्रिक बस अशा प्रत्येक सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प तयार झाले आहेत. वाहतुकीच्या प्रत्येक मार्गाला आपआपसात जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. मुंबई मेट्रो लाईन-3 चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. यामुळे गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यापूर्वी मेट्रो-3 दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरु होती. आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. यात विज्ञान केंद्र (नेहरू सेंटर) ते कफ परेड पर्यंतच्या 11 स्थानकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात विमानतळ आणि मेट्रोव्यतिरिक्त मुंबई वन नावाच्या एका एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे देखील लोकार्पण होणार आहेत. त्यानंतर उद्या ते ब्रिटीश पंतप्रधान सर किअर स्टारमर यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

नवी मुंबई, दि. ८ :

SL/ML/SL 8 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *