जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तासाभरात पोहोचणारे Space Craft

न्यूयॉर्क, दि. ८ : अमेरिकी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इन्व्हर्जन’ने जगातील पहिलं अस हे अनोखं डिलिव्हरी यान लाँच केल आहे, जे पृथ्वी तालावर कोणत्याही ठिकाणी फक्त एका तासाच्या आत आवश्यक सामान पोहोचवू शकते. यामधून २२७ किलो वजनाचं सामान एकावेळी पाठवता येऊ शकत. ‘आर्क’ असं या यानाचं नाव आहे. हे यान ताशी तब्बल २४,७०० किलोमीटर वेगानं ते प्रवास करू शकते. आर्क हे यान फक्त ८ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहे. अंतराळातून परतताना स्वतःच स्वत:ला ते कंट्रोल करत आणि पॅराशूटच्या साहाय्यानं थेट लँडिंग करत.
यामुळे नैसर्गिक आपत्ती, औषधं, लस, वैद्यकीय उपकरणं हे एका तासात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणं शक्य होईल. या यानामुळे येणाऱ्या काळात अंतराळाचा वापर केवळ संशोधनापुरता मर्यादित राहणार नाही आहे. तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या स्पेसएक्ससारख्या कंपन्यांच्या सॅटेलाइट मिशनसाठी स्पेसक्राफ्ट लाँचिंग, परतीचा प्रवास आणि इतर खर्च मिळून सुमारे ५५ लाख डॉलर (सुमारे ४८ कोटी रुपये) इतका खर्च यामध्ये येतो. या तुलनेत ‘आर्क’चं ऑपरेशन अतिशय स्वस्त आहे, कारण ते पूर्णपणे रियुजेबल आहे.शिवाय आर्क हे यान आधीच पृथ्वीच्या कक्षेत ठेवलं जाईल आणि मग जेव्हा गरज भासेल, तेव्हा ते एका तासाच्या आत जगभर कुठेही आवश्यक डिलिव्हरी आता पोहोचवली जाणार आहे.
SL/ML/SL 8 Oct. 2025