Gmail ला टक्कर देणार स्वदेशी Zoho इमेल

नवी दिल्ली, दि. ८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांचा ईमेल पूर्णपणे भारतीय बनावटीच्या Zoho Mail प्लॅटफॉर्मवर (Made-in-India Zoho Mail) स्विच करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शुल्क ( दबावाच्या पार्श्वभूमीवर, ‘स्वदेशी’ (Swadeshi) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही Zoho च्या ऑफिस सूट सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्याची घोषणा केली होती.
गृहमंत्री अमित शाह यांनी ‘X’ (पूर्वीचे Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्विच करण्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीत केला, ज्यामुळे ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
Zoho Mail हे आता Gmail ला एक मजबूत पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे. गोपनीयता-केंद्रित (Privacy-focused) आणि जाहिरात-मुक्त (Ad-free) ईमेल हे झोहोचे वैशिष्य आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये याला मोठी पसंती मिळत आहे.
SL/ML/SL 8 Oct. 2025