मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने केली पूरग्रस्तांना रु. १,५१,०००/- ची मदत

मुंबई, दि ८– सोलापूर आणि मराठवाडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तर्फे जमा करण्यात आलेला रु. १,५१,०००/- इतका मदत निधी आज मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी केले. या निधी संकलन मोहिमेत संघटनेच्या महिला सदस्यांनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला असून, अनेकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी योगदान दिले. या वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या या सामाजिक कार्याचे आणि विशेषतः महिला सदस्यांच्या पुढाकाराचे मनःपूर्वक कौतुक केले. “महिलांचा असा सहभाग समाजात संवेदनशीलता, एकता आणि जबाबदारीचा आदर्श निर्माण करणारा आहे,” असे दादांनी नमूद केले.
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन सदैव जनतेच्या सेवेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी तत्पर राहील. संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आमची आणि संघटनेची ओळख असल्याची माहिती मुस्लिम असोसिएशनचे सलीम सारंग यांनी दिली. या प्रसंगी संघटनेच्या आयशा खान, मुस्कान शेख तसेच अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.KK/ML/MS