‘मनाचे श्लोक’ चित्रपट सापडला वादात

मुंबई, दि. ७ : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा दिग्दर्शक म्हणून नवा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे . पण या चित्रपटाच्या नावावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे . मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिलाय
सज्जन गड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या सिनेमाच्या नावाला विरोध केला आहे. ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे. तथापि, अद्याप या प्रकरणी सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.
ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहात आहे. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार, ते दोघं एकत्र येतील का, लग्नासाठी तयार होतील का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात. पण आता या चित्रपटाच्या नावावरून वाद सुरु झालं आहे.
SL/ML/SL 7 Oct. 2025