गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक येथे साकारणार चित्रनगरी

मुंबई, दि. ६ – नाशिक विभाग विकास कार्यक्रम २००९ अन्वये नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावीत असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुंदर आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी पासून मुंबईचे अंतरसुद्धा लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही लवकरच एक भव्य चित्रपटनगरी साकारणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आजही नाशिक परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण केले जाते.
नियोजन विभागाने सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टी करिता रुपये १० कोटी इतका नियतव्यय सुद्धा मंजूर केलेला होता.या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव ता. इगतपुरी येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे नंबर 459 येथील 54.58 हेक्टर मधील 47 हेक्टर 39.4 आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी जमीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे.
पुढे ते म्हणाले की, गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक चित्रनगरी उभारण्यासाठी हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य व सुसाध्य आहे किंवा नाही याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मिटकॉन या संस्थेला देण्यात आलेले होते.मिटकॉन या संस्थेने व्यवहार्यता अहवाल तयार करून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सादर केलेला आहे.महामंडळाने या व्यवहार्यता अहवालाचे विश्लेषण व तपासणी करून हा अहवाल शासनास सादर केलेला आहे.
यावेळी अजित पवार यांनी निर्देश दिले की, प्राप्त अहवालाचे विश्लेषण करून या प्रकल्पाचा फायनान्शिअल वायबिलिटी व गॅप अनालिसिस करण्यासाठी के.पी.एम.जी या तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. या सल्लागार संस्थेने नोव्हेंबर अखेरपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ही जागा सांस्कृतिक कार्य विभागाला देणे बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये आदेश दिले.
या बैठकीत बोलताना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार म्हणाले की नाशिक येथे चित्रनगरी व्हावी या मताचे आमचा विभाग आहे. या चित्रनगरीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचे निर्देश देखील सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिले. या ठिकाणी चित्रनगरी सोबतच अमुझनेंट पार्क करण्यात यावा अशी अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.ML/ML/MS