गोवा हिंदू असोसिएशनचा वर्धापन सोहळा, रंगभूमीवरील दिग्गजांचा सत्कार…

मुंबई दि ६ — गोवा हिंदू असोसिएशनने सन २०२५ ते २०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली असून, या कार्यकारिणीच्या वतीने एक भव्य वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत दादर हिंदू कॉलनीतील प्राचार्य बी.एन. वैद्य सभागृहात पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विख्यात अभिनेते पद्मश्री अशोक सराफ हे लाभले असून, प्रमुख पाहुणे म्हणून अनिल खवंटे यांची उपस्थिती राहणार आहे.
गौरव सोहळा आणि पुरस्कार विजेते..
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे:
प्रसिद्ध अभिनेते : दिलीप प्रभावळकर
ज्येष्ठ रंगकर्मी : सतीश आळेकर
साहित्यिक: डॉ. वामन नाईक
साहित्यिक : अन्वेषा सिंगबाळ
साहित्यिक : नमन सावंत-धावस्कर
दिग्दर्शक : गंगाराम नार्वेकर
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे., या सोहळ्याची उत्सुकता सर्वत्र निर्माण झाली आहे.ML/ML/MS