वाघोबाची दुचाकीववर चाल..! नशीब बलवत्तर म्हणून बचावले दुचाकीस्वार

चंद्रपूर दि ६ :- उमा नदीच्या पुलावर रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत दुचाकीस्वारांचा वाघाशी सामना झाला. पट्टेदार वाघ अचानक रस्त्यावर आल्याने क्षणभरात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली होती; मात्र दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत थोडक्यात जीव वाचविला.शिवणी येथे जेवणासाठी गेलेले रत्नापूर-नवरगाव येथील काही नागरिक चारचाकी वाहनातून परतत असताना उमा नदीवरील पुलावर त्यांना रस्त्याच्या मधोमध पट्टेदार वाघ बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबविले.
दरम्यान, त्यांच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांना या प्रसंगाची कल्पना नव्हती. चारचाकीतील नागरिकांनी दुचाकीस्वारांना सावध करण्याचा प्रयत्न केला; मात्र आवाज न गेल्याने दुचाकी थेट वाघाजवळ, अवघ्या काहीच अंतरावर पोहोचली. समोर वाघ पाहून दुचाकीस्वारांची पार बोबडी वळली. वाघ उडी मारण्यासाठी सज्ज होता. परंतु, दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत वेळेत वाहन सावरले आणि थोडक्यात जीव वाचविला.ML/ML/MS