राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ…

अमरावती दि. ५ : अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजात आज सकाळी 5 वाजता तीर्थ स्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवाला झाला प्रारंभ झाला. तीर्थ स्थापनेला हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते, सामुदायिक ध्यानानंतर गुरूकुंज नगरी मधून संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व सामाजिक सुधारणा केली. तुकडोजी महाराजांनी लिहिलेली प्रसिद्ध अशी ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करण्यात आली होती. सर्वधर्म समभावाची शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या गीत व भजनातून समाजाला दिली आहे.
11 ऑक्टोंबर ला तुकडोजी महाराजांना देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 5 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर पर्यंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव चालणार आहे. पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 12 ऑक्टोबरला गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता होणार आहे.ML/ML/MS