या वर्षी October Heat पासून सुटका

मुंबई, दि. ४ : लांबलेल्या पावसाळ्यामुळे यावर्षी ऑक्टोबर हीटपासून नागरिकांची सुटका होणार आहे. सहा वर्षांनंतर ऑक्टोबरची तीव्रता कमी असण्याची स्थिती उद्भवणार आहे. ९ ते २३ ऑक्टोबर या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वीच बदलत्या वातावरणाचा अभ्यास केला. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार ९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत थंडी वाढून पाऊसही पडेल. परिणामी महाराष्ट्रातील नागरिकांची तीव्र उन्हापासून सुटका मिळण्याची शक्यता वाढली आहे.
यंदा ऐन दिवाळीच्या आठवड्यात राज्यात आल्हाददायक वातावरण असेल, अशी दाट शक्यता आहे. हवामान वैज्ञानिक एस. डी. सानप आणि डॉ. प्रवीण कुमार यांच्या विश्लेषणानुसार, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील नागरिकांना उष्णतेऐवजी पाऊस आणि थंडीचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यात सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची दाट शक्यता असून, विशेषतः पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक राहील. महाराष्ट्रामध्ये ९ ते २३ ऑक्टोबर या दोन आठवड्यांदरम्यान हवामान सामान्यापेक्षा अधिक थंड आणि अधिक पावसाळी, दमट राहील.
SL/ML/SL 4 Oct. 2025