‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

 ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

मुंबई, दि. 4 : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (८७) यांचे आज निधन झाले. संध्या या व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या. आज सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले’ असे किरण शांताराम यांनी सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीमधील आयकॉनिक सिनेमा म्हणून ‘पिंजरा’ ओळखला जातो. या सिनेमातील बहारदार नृत्याने अभिनेत्री संध्या शांताराम यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एक नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारिती होता. या चित्रपटातील संध्या यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी नवरंग, अमर भूपाळी, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली. आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते.

SL/ML/SL 4 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *