संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवाला सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

 संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवाला सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

रायगड दि २ : कर्जत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या पारंपरिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध संचलन केले. शस्त्रपूजन विधी पार पडल्यानंतर देशभक्तीपर वातावरणात घोषणाबाजी, परंपरा आणि सांघिक शिस्तीचे दर्शन घडले.

कार्यक्रमात बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना नसून राष्ट्रीय संस्कार घडवणारी आणि देशभक्तीची भावना रुजवणारी जीवनशैली आहे. अशा संघटित व सशक्त कार्यातूनच समाजजीवनात सकारात्मक बदल घडतात.” याप्रसंगी स्थानिक स्वयंसेवक, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी प्रा. शिंदे यांचे मनापासून स्वागत केले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *