आता अनिर्णीत प्रश्नावर आंदोलन करावे लागणार
कामगार नेते गोविंदराव मोहिते

 आता अनिर्णीत प्रश्नावर आंदोलन करावे लागणारकामगार नेते गोविंदराव मोहिते

मुंबई, DI १ : केंद्र सरकारने आधिच फोर कोड बिल संमत करून कामगार चळवळीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर‌ करतानाच, कामाचे १२ तास वाढविण्याचा जुलमी निर्णय घेऊन कामगार वर्गाचे खच्च्चीकरण केले आहे आणि एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तर सरकारने पूर्णपणे डोळे झाक केली आहे, तेव्हा सरकारच्या या कामगार विरोधी धोरणावर आता मंत्री किंवा संबंधित आमदारांना जाब विचारण्याची वेळ आली आहे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना केले आहे.
‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७९ वा वर्धापनदिन सोहळा परेलच्या मनोहर फाळके‌ सभागृहात संपन्न झाला. उद्याचा विजया दशमी आणि संघाचा वर्धापन असे दोन्हीही दिवस आज पूर्वसंध्येला पार पडले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने मनोहर फाळके सभागृहात ऊद्याचे दोन्ही सोहळे आज पुर्वसंध्येला संपन्न झाले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर कामात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.तरीही‌ त्यांच्या शुभेच्छा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात दिल्या.‌शुभेच्छा देताना संघटितशक्ती अधिक मजबूत करण्याचे आवाहन अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी कामगारवर्गाला केले आहे.
‌‌ या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर यांची भाषणे झाली.त्या वेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी यांचे संघटना स्थापने मागील योगदान आणि संघटनेने अनेक प्रसंगांना ज्या धैर्याने तोंड दिले,त्याची माहिती अनेक पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात त्या वेळी दिली.या प्रसंगी राजन लाड, ऊत्तम गिते,जी.बी गावडे,मिलिंद तांबडे,शिवाजीकाळे,साईकुमार निकम, किशोर रहाटे,भाऊसाहेब आंग्रे आदी मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *