बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने त्वरीत कार्यवाही करावी

 बारामती, यवतमाळ, धाराशिव, लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने त्वरीत कार्यवाही करावी

मुंबई, दि १:- बारामतीसह यवतमाळ, धाराशिव व लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बारामती विमानतळाचा नाईट लँडिंगसह विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे (विमान चालन) अपर मुख्य सचिव संजय सेठी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कैलास भांडेकर हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, एमआयडीसी पुणेचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

एमआयडीसीने तयार केलेला बारामती विमानतळ नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा. उद्योग विभागाने विमानतळ हस्तांतरणासाठी आवश्यक तो शासन निर्णय निर्गमित करावा. बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणाचा मास्टर प्लॅन, डीपीआर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे व बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणासाठी संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *