नवरात्रोत्सवात दिला आईने कौल
मुंबई दि. १ : आई चिंचबादेवी मंदिर , घोडबंदर, जिल्हा ठाणे बाबत महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात , वनविभाग संबंधित अधिकारी वर्ग, श्री ग्रामदैवत ट्रस्ट, यांचे समवेत मंदिराच्या जमिनीच्या अदलाबदलबाबत सकारात्मक सभा संपन्न झाली.

जागा अदलाबदली हे शासन नियमात बसते यामुळे या निकषावर पुढे अधिकारी वर्गाला सहकार्य करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले.

या कामी घोडबंदर गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम ठाकूर, दूरदर्शन वार्ताहर मिलिंद लिमये यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत सिताराम वैती, चंद्रकांत पांडुरंग तरे (सचीव) केदारनाथ शिवराम किणी (सदस्य) अरूण काशिनाथ भोईर (सदस्य) बैठकीला उपस्थित होते.ML/ML/MS