दीक्षाभूमी येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण
नागपूर दि १ : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळेला स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेला बुद्ध वंदना देखील करण्यात आली. 30 सप्टेंबर पासून दिक्षाभूमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून त्यांची सुरुवात देखील झालेली आहे. दीक्षाभूमी येथे अनुयायांचे थवेच्या थवे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे.ML/ML/MS