जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘”रिव्हर राफ्टींग”‘ सुरू….

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘”रिव्हर राफ्टींग”‘ सुरू….

महाड दि २८ – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात जागतिक पर्यटन दिनानिमित्त रानबाजिरे येथील धरणालगतच्या पुलालगत नरवीर ऍडव्हेंचर्स ऍण्ड स्पोर्टस रिव्हर राफ्टींगच्या या साहसी खेळाचा शुभारंभ विकास गोगावले यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

“पोलादपूरच्या दरी डोंगराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला निसर्ग संपन्नतेची जोड असून या दूर्गम डोंगराळ तालुक्यात पर्यटन विकासाला तसेच व्यवसायांना युवावर्गाच्या मदतीने मंत्री गोगावले आणि राज्य सरकारमार्फत चालना देण्यात येईल,” अशी ग्वाही शिवसेनेच्या युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी दिली.

याप्रसंगी तहसिलदार कपिल घोरपडे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, नगरसेवक, कोलाड येथील रिव्हर राफ्टींग उपक्रमाचे हरिश सानप आणि सहकारी तसेच पोलादपूरचे नरवीर ऍडव्हेंचर्सचे सदस्य, तरूण उपस्थित होते. यावेळी रिव्हर राफ्टींगच्या वॉटरबोटचा शुभारंभ विकास गोगावले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून तसेच पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

याप्रसंगी विकास गोगावले यांनी, “घागरकोंडच्या झुलत्या पुलापासून पोलादपूर तालुक्यातील कोणते पर्यटन स्थळ विकासित करून तरूणांसाठी रोजगार निर्मिती करण्याची भूमिका पुढे आली तर त्याकामी अवश्य सहकार्य करू,” अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी तहसिलदार घोरपडे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *