परभणीत रेड अलर्ट, मुसळधार पाऊस सुरू

परभणी दि २८ : जिल्ह्यात रेड अलर्ट झोन असल्याने मुसळधार पाऊस सुरू आहे,त्यामुळे परभणी शहरासह अनेक भागात पाणी
साचले आहे, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील घरांची पडझड झाली असून संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्याची नुकसान झाले .
येलदरी धरणातून पुर्णा नदीपात्रात १०क्युसेक्स क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत २१ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याबाहेरील जायकवाडी धरणातून १ लाख २२ क्युसेक्स आणि माजलगाव धरणातून मोठ्याप्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग वाढल्याने पूर परिस्थिती कायम आहे.नदी काठच्या गावांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आणि सर्तक राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह परदेशी यांनी केले आहे.ML/ML/MS