या विमानतळाला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल’ कडून 5-स्टार रेटिंग

 या विमानतळाला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल’ कडून 5-स्टार रेटिंग

नवी दिल्ली, दि. २५ : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला ब्रिटनच्या ‘ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल’ने (BSC) या विमानतळाला आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 5-स्टार मानांकन दिले आहे. विशेष म्हणजे, हे मानांकन मिळवणारे हे 2025 मधील भारत आणि आशियातील एकमेव विमानतळ आहे. या कामगिरीमुळे ते जगातील निवडक उत्कृष्ट विमानतळांच्या यादीत सामील झाले आहे. हे मानांकन मिळवण्यासाठी अत्यंत कठोर ऑडिट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेमध्ये 4,500 पेक्षा जास्त जागतिक मानकांची कसोटी लावण्यात आली होती.

विमानतळाने ‘झीरो हार्म’ (Zero Harm) हे उद्दिष्ट ठेवले आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले असून, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ‘लाइफ सेफ्टी सिस्टम रिक्वायरमेंट्स’ (LSSR) ट्यूटोरियल व्हिडिओ आणि एक विशेष प्रशिक्षण पोर्टल सुरू करण्यात आले आहे. विमानतळाने आतापर्यंत सुरक्षितपणे दीड कोटी मानवी तास पूर्ण केले आहेत. यात एकही ‘लॉस्ट टाइम इंज्युरी’ (LTI) झालेली नाही.

987 एकर परिसरात पसरलेले हे विमानतळ गेल्या 80 वर्षांपासून सेवा देत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या विमानतळाने 1.33 कोटी प्रवाशांची वाहतूक केली असून इथे दररोज 280 विमान सेवा हाताळल्या जातात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *