मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे क्रीडामंत्री कोकाटेंचे आवाहन

नाशिक, दि. २५: राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून या संकटकाळात बळीराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय शेतकरीपुत्र आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे. आपल्या अधिकृत सोशल पेजच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे.
मराठवाड्यासह अनेक ठिकाणी सामान्य नागरिक, शेतकरी यांच्या शेतीसह घरांची आणि पशुधनाची अपरिमित हानी झाली आहे. या प्रसंगातून लवकरात लवकर सावरण्यासाठी आर्थिक मदत आणि जीवनावश्यक गोष्टींची परिपूर्तता होणे गरजेचे आहे. यासाठी दि. 26 सप्टेंबर रोजी या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम साजरे न करता तसेच कोणतेही शुभेच्छा फलक न लावता थेट पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शक्य तितके योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तपशील
Account Name: Chief Minister’s Relief Fund
Account Number: 10972433751
IFSC Code: SBIN0000300
ML/ML/MS