मुंबई विद्यापीठात पाली भाषा – आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली आंदोलक भिक्खूंची भेट

आंदोलनकर्ते व कुलगुरु यांची संयुक्त बैठक लावा
मुंबई, दि 2४-मुंबई विद्यापीठात पाली भाषा विभागाला स्वतंत्र जागा देऊन इमारत बांधण्यात यावी.महाराष्ट्र शासनाने पालीभाषा विभागासाठी रुपये ५० कोटीची भरीव तरतूद उपलब्ध करून द्यावी. पाली भाषा विभागासाठी कायम व स्थायी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच . पाली भाषा विभाग अनुदानावर आणण्यात यावा अशा मागण्या मेहकरचे आमदार सिदार्थ खरात यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत यासंदर्भात कालिना विद्यापीठात चाललेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत असून विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होत असल्याचा ईशारा आमदार खरात यांनी दिला आहे
मुंबई विद्यापीठात पाली भाषेचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी भंते विमांसा व भंते पूर्णा यांच्या नेतृत्वाखालील कालिना विद्यापीठात मागील 34 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे.मेहकरचे आमदार व मंत्रालयातील माजी अधिकारी सिध्दार्थ खरात,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष विजय वाघमारे तसेच रिपब्लिकन सेनेचे विद्यार्थी नेते आशिष गाडे.यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.यावेळी आमदार सिध्दार्थ खरात यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली.आमदार खरात यांनी कालच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपले पत्रही दिले आहे .
पाली भाषा विभागासाठी विद्यापीठाने प्रयत्नपूर्वक योजना आखून जास्तीत जास्त विद्यार्थी पाली भाषा विषय निवड करतील यासाठी प्रयत्न करावेत.पाली भाषेचे शॉर्ट टर्म व लाँग टर्म अभ्यासक्रम विकसित करावेत.
पाली भाषा संशोधन करण्यासाठी प्रचार, प्रसार व प्रोत्साहन देण्यात यावे.पाली भाषा विभागाला विद्यापीठ आवारात स्वतंत्र जागा देऊन इमारत बांधण्यात यावी. ५. महाराष्ट्र शासनाने पालीभाषा विभागासाठी रुपये ५० कोटीची भरीव तरतूद उपलब्ध करून द्यावी. ६. पाली भाषा विभागासाठी कायम व स्थायी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी. पाली भाषा विभाग अनुदानावर आणण्यात यावा अशा मागण्या आमदार खरात यांनी केल्या आहेत
पालीभाषेवर प्रेम असणाऱ्या विद्यार्थी वर्गात तसेच समाजात या विषयावर अतिशय असंतोषाचे वातावरण असून मुंबई विद्यापीठामध्ये याबाबत भन्ते विमान्सा यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलने, उपोषण सुरू आहेत. तरी या विषयावर तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचे परिणाम समाज माध्यमाद्वारे संपूर्ण राज्यात पसरत असून विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत वरील विषयांवर आपल्या स्तरावर संबंधित आंदोलनकर्ते, कुलगुरु तसेच कुलसचिव यांचेसह बैठकीचे आयोजन करून यावर तातडीने कायमस्वरूचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी खरात यांनी केली आहे.KK/ML/MS