अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि २४: माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व मराठा आरक्षण मागणीचे शिल्पकार स्वः आमदार अण्णासाहेब पाटील यांना २५ सप्टेंबर रोजी ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. नवी मुंबईत जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मौजे मंडळकोळे या छोट्याशा गावात अण्णासाहेब
पाटील यांचा २५ सप्टेंबर १९३३ रोजी जन्म झाला. जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली.
हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी नोकरी पत्करली, हे हमालीचे काम करत असताना आपल्या बरोबरीच्या कामगारांच्या कष्टाची होणारी आर्थिक पिळवणूक पाहून त्यांनी त्या लाकडाच्या वखारीतच बॉम्बे टिंबर अलाईड वर्कर्स युनियनची स्थापना केली. तेथूनच त्यांनी कामगार चळवळीला वाहून घेतले. १९६४ मध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या
नावाने युनियनला रीतसर नोंदणी
मुंबईमध्ये मालाची चढ-उताराची कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांची ऐतिहासिक अशी चळवळ त्यांनी उभी केली. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांमध्ये अण्णासाहेबांनी शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहकार्य करणाऱ्या माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पिटल इत्यादी संस्थांची निर्मिती केली.KK/ML/MS