दगडी चाळीत साकारले राजस्थान येथील भव्य मंदिर, भाविकांची होते अलोट गर्दी

मुंबई, दि २४
मुंबईतल्या प्रसिध्द दगडी चाळीतल्या देवीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या देवीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून असंख्य देवी भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर काही देवी भक्त ओटी भरण्यासाठी दुबई, अमेरिकेतून हवाई मार्गाने मुंबईत दाखल होऊन आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देवीकडे साकडे घालत असतात.
दगडी चाळीतल्या देवीकडे महिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असल्यामुळे दरवर्षी ओटी भरणाऱ्या महिलांची रांग चाढतच चालली आहे. विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पुणे, सांगली सातारा येथून मोठ्या प्रमाणात महिलावर्ग देवीची ओटी भरण्यासाठी दगडी चाळीत येत असतात. तसेच अनेक राजकीय पक्ष दरवर्षी संपूर्ण नवरात्रात नऊ दिवस महालक्ष्मी, आर्थर रोड, मुंबादेवी अशा विविध देवींच्या दर्शनासाठी महिलाना मोफत बसेस उपलब्ध करून देत असतात. त्यांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी गर्दी असते.
तसेच दुबई अमेरिकेसारख्या देशात स्थायिक झालेली मंडळी खास नवरात्र उत्सवासाठी आणि दगडी
चाळीतल्या देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दुबई ते अमेरिका अशी वारी करून अनेक महिला दर्शनासाठी येत असल्याची माहिती मंडळाचे सेक्रेटरी अनिल शिंदे यांनी दिली.
मुंबईतल्या पाच प्रमुख देवांचे दर्शन घेण्याची सरकारने काही वर्षांपूर्वी
जाहिरात केली होती. त्या जाहिरातीत दगडी चाळीच्या देवीचा देखील समावेश करण्यात आला होता. यंदा राजस्थानमधल्या एका देवीच्या मंदिराप्रमाणे भव्य दिव्य देखावा बेडिंग प्लॅनर गणेश यांनी साकारला असून सदर देखाव्याची संपूर्ण सोशल मिडियावर चर्चा होत आहे.KK/ML/MS