वरळी येथील स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद

 वरळी येथील स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद

मुंबई, दि २३
शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आज वरळी प्रभाग क्रं १९७ मधील राजीव नगर परिसरामध्ये माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वतीने स्वछता मोहीम राबविण्यात आली. या सूचना मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सुचिता मोहिमेमध्ये महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी परिसराची संपूर्णपणे साफसफाई करून हा परिसर औषध फवारणी करून फवारण्यात आला. या स्वच्छता मोहिमेबाबत विभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांचे मनापासून आभार मानले. आम्ही समाजात चांगले कार्य करत असतो स्वच्छता हीच सेवा या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण प्रभाग स्वच्छता मुक्त करण्याचा वसाहती घेतलेला आहे. त्यानुसार आम्ही प्रभागात सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत असून यापुढे देखील आम्ही स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी दिली.सदरप्रसंगी वरळी महिला विभागप्रमुख रत्ना महाले,वरळी महिला विधानसभा संघटक अस्मिता ननावरे,शिवसेना वरळी महिला विधानसभा समनव्यक रोहिणी खडांळे,शाखा प्रमुख राजेश पांडे साहेब, महिला शाखाप्रमुख लीनाताई कदम,युवा शाखा प्रमुख विनायक गांगुर्डे तसेच सर्व महिला व पुरुष, युवा व युवती उपशाखा प्रमुख पदाधिकारी व संबधित महानगरपालिकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *