सोलापुरात मदतीसाठी NDRF तैनात…

सोलापूर दि २३ : सोलापुरात पुराच्या गंभीर परिस्थितीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अन्य जिल्ह्यातून शोध व बचाव कार्यासाठी मनुष्यबळासह 11 बोटी मागविल्या आहेत. या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी NDRF तुकडी तैनात करण्यात आली आहे. दारफळ येथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आर्मी शी संपर्क करून एअरलिफ्ट ची व्यवस्था केली.
माढा येथे एनडीआरएफचे एक बचाव पथक कार्यरत होते, जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून दुसरे बचाव पथक दोन तासात मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येत आहे.ML/ML/MS