कुर्कुरे® चा २५ वर्षांचा उत्सव – आता ज्वारीवर आधारित ‘ज्वार पफ्स’सह पेप्सिको इंडियाचा स्नॅकिंग वारसा विस्तारतो

**मुंबई, दि २२– पेप्सिको इंडियाचा लोकप्रिय देशी ब्रँड *कुर्कुरे®* आपल्या २५ वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने एक नवी झळाळीदार इनोव्हेशन सादर करत आहे – कुर्कुरे ज्वार पफ्स. भारतात वाढत्या मिलेट-आधारित स्नॅकिंग ट्रेंडमध्ये पाऊल ठेवत, कुर्कुरेने पारंपरिक ज्वारी आणि आधुनिक चव यांचा संगम साधला आहे. भाजलेले (तळलेले नाही), हे पफ्स ग्राहकांना पारंपरिक घटकांचा आधुनिक आणि मजेदार अनुभव देतात.
भारतीय खाद्यसंस्कृतीत सध्या मोठे बदल होत आहेत – पारंपरिक घटक पुन्हा लोकप्रिय होत आहेत, ग्राहक अधिक सजग आणि स्थानिक ब्रँड्सना पसंती देत आहेत. या बदलत्या प्रवाहात आणि मिलेट्सच्या वाढत्या महत्त्वात पेप्सिको इंडियाला भारताच्या वारसाला नव्या पिढीसाठी पुन्हा सादर करण्याची संधी मिळाली आहे.
२५ वर्षांपासून कुर्कुरे हे पूर्णपणे भारतात तयार झालेले, विकसित झालेले आणि भारतीय ग्राहकांसाठीच डिझाइन केलेले उत्पादन आहे. या वारशावर आधारित आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींचा सखोल अभ्यास करून, कुर्कुरे ज्वार पफ्स हे उत्पादन भारताच्या पाककृती परंपरेला आधुनिकतेच्या चौकटीत सादर करत आहे – इस्से अच्छा क्या होगा!
आस्था भसीन, डायरेक्टर मार्केटिंग – कुर्कुरे आणि डोरीटोज, पेप्सिको इंडिया म्हणाल्या:
“पेप्सिको इंडियामध्ये ग्राहक-केंद्रितता हे आमच्या प्रत्येक कृतीचे केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे सतत नव्या चव आणि फॉरमॅट्समध्ये इनोव्हेशन करत राहणे, तेही भारताच्या समृद्ध पाककृती परंपरेशी जोडलेले. कुर्कुरे® ज्वार पफ्स हे पारंपरिक ज्वारीला एक मजेदार आणि सहज उपलब्ध फॉरमॅटमध्ये सादर करत आहेत – इस्से अच्छा क्या होगा! हे उत्पादन आमच्या त्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, ज्यात आम्ही ग्राहकांना आनंद देतो आणि भारताच्या वारशाशी जोडलेले घटक पुढे नेत राहतो.”
सखोल R&D आणि ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित हे उत्पादन कुर्कुरेला भारताच्या स्नॅकिंग श्रेणीत एक अग्रगण्य ब्रँड म्हणून अधोरेखित करते. मिलेट्ससारख्या उदयोन्मुख श्रेणीत प्रवेश करत, कुर्कुरेने आपल्या स्केल आणि पोहोच वापरून ही इनोव्हेशन लाखो घरांपर्यंत पोहोचवली आहे.
कुर्कुरे® ज्वार पफ्स हे INR 10 आणि INR 20 च्या पॅकमध्ये उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतात उपलब्ध असतील – आधुनिक आणि पारंपरिक किरकोळ विक्री केंद्रांवर, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आणि क्विक-कॉमर्स अॅप्सवर. या लॉन्चला टीव्ही, डिजिटल आणि रिटेल टचपॉइंट्सवर आधारित मजबूत मीडिया प्लॅनचा पाठिंबा मिळणार आहे.
कुर्कुरे® बद्दल:
कुर्कुरे® हे भारतात विकसित झालेले उत्पादन असून देशभरातील ग्राहकांमध्ये याने एक मजबूत नातं निर्माण केले आहे. पेप्सिको इंडियाच्या पोर्टफोलिओतील आठ ब्रँड्सपैकी कुर्कुरे® हा एक असून प्रत्येक ब्रँड वार्षिक अंदाजे INR 1000 कोटींची रिटेल विक्री करतो. कुर्कुरे® चा विस्तार विविध स्नॅकिंग फॉरमॅट्समध्ये करत, पेप्सिको भारतात मजबूत मास्टर ब्रँड्स तयार करत आहे. कुर्कुरे® आता UAE, कॅनडा, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तयार आणि विकले जाते.KK/ML/MS