मुंबई देवी मंदिरात अश्विन नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर पासून

मुंबई, दि २१
मुंबईचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मुंबादेवी मंदिर येथे यंदाचा अश्विन नवरात्र उत्सव सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी, गुरुवार ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी होईल. घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० ते ७.५९ या शुभमुहूर्तात होणार असून, ललिता पंचमी दिवशी, म्हणजे २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत दिपोत्सव साजरा करण्यात येईल. विशेष आकर्षण ठरणार आहे ते विश्वकल्याणासाठी होणारा श्री चंडी महायज्ञ. नवमीचे हवन बुधवार, ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून, पूणाहुती संध्याकाळी ५.०० ते ५.३० दरम्यान दिली जाणार आहे. कोजागरी पौर्णिमा सोमवार, ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२३ वाजता सुरू होणार असून, ती मंगळवार, ०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.१६ वाजता समाप्त होईल. याच दिवशी मासिक नवचंडी महायज्ञ सकाळी ७.००
वाजता सुरू होऊन ११.३० वाजता पूणाहुती होईल. दररोजच्या आरत्या पुढील वेळेनुसार होतील
मंगला आरतीः सकाळी ५.३० मुख्य सकाळची आरतीः ९.३० नैवेद्य आरतीः ११.३० धुप आरतीः संध्याकाळी ६.३० मुख्य रात्र आरतीः ८.०० शयन आरतीः रात्री ९.४५ भाविकांनी मुंबादेवी मंदिराच्या अधिकृत पेजवरून – “Shree Mumbadevi Mandir Charities” – Live आरती आणि पूजा घरबसल्या अनुभवता येतील. अधिक माहितीसाठी वेबसाइट भेट द्याः www.mumbadevi.इन
KK/ML/MS